1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 मे 2017 (11:50 IST)

सोनिया गांधी यांना अन्नातून विषबाधा, प्रकृती स्थिर

sonia gandhi

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अन्नातून विषबाधा झाल्याने रविवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलं आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सध्या चांगली असून लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल असे रुग्णालयातील प्रमुख डॉ. डी एस राणा यांनी सांगितले.