गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (16:07 IST)

नागपूर : रिक्षाचे स्टंट रोकले म्हणून केला महिलेचा विनयभंग

कोणाला चांगले सांगितले तरी ते अंगाशी येते असाच प्रकार राज्याची उप राजधानी  नागपूर येथे घडला आहे. यामध्ये महिलेच्या घरासमोर  आडवातिडवा वेगात  रिक्षा आॅटो चालविण्यास मनाई केली म्हणून दोघांनी महिलेसोबत अत्यंत  लज्जास्पद वर्तन केले आहे. तर त्या प्रकारात पडले म्हणून  तिच्या नातेवाईकांनीही अश्लील शिवीगाळ तर केलीच तर त्यांना जीवे  मारण्याची धमकी दिली आहे.

नागपूर येथील मानकापूर भागात  ही घटना घडली. फिर्यादी महिला तिच्या घराच्या अंगणात काम करत होती. यामध्ये प्रमुख सशयित प्रमोद उर्फ छोटू चंद्रिकाप्रसाद मिश्रा, हिमांशू सुभाष पांडे हे दोघे वेगात आणि आडवातिडवा आॅटो चालवित होते. हे जीवाशी येणारे स्टंट  महिलेने आक्षेप घेतला. त्यामुळे आरोपी मिश्रा आणि पांडेसोबत तिची बाचाबाची झाली होती. त्यानंतर पीडित महिलेने मानकापूर ठाण्यात  तक्रार  नोंदवून आरोपी मिश्रा आणि पांडेने तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करून आपल्या नातेवाईकांना मारण्याची धमकी दिली, असा आरोप केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.