शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (11:14 IST)

कर्जमाफीचे पैसे वाटपाला सुरुवात

कर्जमाफी योजनेचे पैसे वाटण्यासाठी अखेर सुरुवात झाली आहे. यामध्ये  2 लाख 39 हजार 610 शेतकऱ्यांसाठी 899.12 कोटी रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली. 11 बँकांना 392 कोटी रुपये देण्यात आले आहेत. 

शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे. या निकषांमध्ये बसण्यासाठी आज 1 लाख 1 हजार 207 शेतकऱ्यांच्या खात्यात 671.16 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यात येणार आहेत.

नियमित कर्ज भरणाऱ्या 1 लाख 38 हजार 403 शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 227.95 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही टप्प्यटप्प्याने रक्कम जमा करण्यात येणार आहे.

राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. 24 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.