गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2017 (10:23 IST)

मॅनहटन : दहशतवादी हल्ला ७ ठार, ११ जखमी

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील मॅनहटनमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. वर्ल्ड ट्रेड सेंटर स्मारकाजवळ सायकलस्वारांसाठी राखीव असलेल्या मार्गावर हा हल्ला झाला. दहशतवाद्याने या मार्गावर ट्रक चालवत अनेकांना चिरडले. यानंतर त्याने ट्रकबाहेर उडी मारुन पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली आणि त्याला ताब्यात घेतले.

सायकलस्वारांसाठी राखीव असलेल्या मार्गावर अनेकांना चिरडल्यावर दहशतवाद्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलिसांना भीती दाखवण्यासाठी त्याने खिशातून दोन बंदुका बाहेर काढल्या. मात्र त्या दोन्ही बंदुका बनावट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ट्रकच्या मदतीने अनेकांना चिरडणारा दहशतवादी हा मूळचा उझबेकिस्तानचा असून त्याचे वय २९ वर्षे आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या दहशतवाद्याचे नाव सेफुल्लो सायपोव्ह असे आहे.