बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017 (12:04 IST)

गुजरातच्या चक्रधर ने तयार केला बुलेट ट्रेनचा लोगो

पंतप्रधान मोदी यांचा महत्वकाक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनचा अधिकृत लोगो अखेर ठरला आहे, यामध्ये अहमदाबाद येथील २७ वर्षीय विद्यार्थी चक्रधर आला केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा लोगो तयार केला आहे. यामध्ये नवीन लोगो कसा असावा हे ठरवण्यासाठी  नुकतीच एक स्पर्धा घेतली होती. यामध्ये चक्रधरने बनविलेल्या लोगोने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याच्या लोगोची निवड समितीने निवड केली असून चक्रधरचा लोगो यापुढे बुलेट ट्रेनची अधिकृत ओळख बनणार आहे.चक्रधर हा द्वितीय वर्षाला नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाईन्सच्या शिकत आहे.

विशेष म्हणजे  त्याने आतापर्यंत केंद्र सरकारच्या विविध ऑनलाइन पोर्टल आणि विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या लोगो मेकिंग स्पर्धेत अनेकदा आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये या प्रकारच्या जवळपास  ३० वेळा चक्रधरने  स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. मात्र त्याला यश मिळाले नाही.आपल्या देशातील पहिल्या अश्या बुलेट ट्रेनच्या लोगो स्पर्धेत चक्रधरच्या लोगोवर केंद्रीय मंडळाने मान्यता दिली आहे.