शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017 (12:10 IST)

दोन शीर असललेल्या बाळाचा मृत्यू

राज्यात चमत्कार घडावी अशी घटना घडली होती. यामध्ये अंबाजोगाई येथील  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन तोंडाचे अर्थात शीर असलेल्या  बाळाने जन्म घेतला होता. मात्र सोमवारी रात्री बाळाचा  मृत्यू झाला. यामध्ये हे बाळ  रविवारी रात्री ८:३० वाजता जन्माला आले होते. या नवजात दोन शीर असलेल्या  बाळावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र वैद्यकीय अहवाल जर पाहिला तर  या प्रकारे जन्म घेणारी  बाळ जगण्याची शक्यता फारच  कमी असते, तरीही डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न करत  त्याचा जीव वाचावा आय साठी उपचार सुरु केले होते. मात्र एका वेळा नंतर  डॉक्टरांच्या उपचाराला या बळाने  प्रतिसाद दिला नाही. तर  या बाळाचा मृत्यू झाला आहे.रुग्णालयातील डॉक्टरांनी या बाळाला वैद्यकीय अभ्यासासाठी रुग्णालयाच्या शरीर रचनाशास्त्र विभागात ठेवण्याची विनंती केली होती मात्र पालकांनी याला नकार दिल्याने डॉक्टरांनी या बाळाचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे सोपवला आहे. हे दोन शिराचे बाळ जन्मले आणि पूर्ण देशात  या बाळाची  चर्चा सुरु होती.