रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 27 जानेवारी 2018 (12:19 IST)

राष्ट्रीय महामार्गावर मदतीसाठी 1033' हेल्पलाइन क्रमांक

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती देण्यासाठी किंवा हायवेवरील एखादी असुविधेबद्दल तक्रार करण्यासाठी केंद्र सरकार नॅशनल टोल-फ्री क्रमांक सुरु करत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हा टोल-फ्री क्रमांक लाँच करणार आहे. यानंतर  '1033' या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करुन अपघाताची माहिती किंवा तक्रार नोंदवू शकता येणार आहे. 

इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (आयएचएमसीएल) राष्ट्रीय महामार्गाचं जीआयएस केलं आहे. यामुळे कॉल सेंटरवर एखादा कॉल आल्यास तो कुठून आला आहे याची माहिती मिळेल आणि तेथील मातृभाषेनुसार संबंधित व्यक्तीकडे तो फोन कॉल ट्रान्सफर करण्यात येईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिका-यानुसार, '1033 हा क्रमांक महामार्गाचा वापर करणा-यांसाठी आणीबाणीच्या तसंच इतर वेळी मदतनीस ठरेल'.