सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 27 जानेवारी 2018 (11:44 IST)

मुंबईत ध्वजावंदना दरम्यान ८ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबईत शिवाजी पार्कवर ध्वजावंदन आणि संचलन सुरु असताना परभणीहून आलेल्या एका कुटुंबातील आठजणांचा आत्मदहनाचा प्रयत्न मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला. परभणीतल्या खान कुटुंबातील हे आठ जण आहेत. 

या कुटुंबीयांनी त्यांच्यासोबत रॉकेलही आणले होतं. पोलीस कोठडीत आपले पती समशेर खान यांचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला होता. पण, संबंधित पोलिसांचे अजूनही निलंबन करण्यात आले नसून, आपल्याला कोणतीही आर्थिक मदतही देण्यात आली नाही, अशी तक्रार करत समेशर यांची पत्नी अखिला बेगम, समशेर खान यांचे बंधू यासिन खान आणि त्यांच्या कुटुंबातल्या इतर सहा जणांनी शिवाजी पार्कवर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टाळला.