गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 जानेवारी 2019 (17:47 IST)

राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ आहे : संजय राऊत

महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि राहणार. दिल्लीचे तख्त देखील हा मोठा भाऊ गदागदा हलवणार. मात्र भाजपाकडून युतीचा प्रस्ताव नाही. सगळ्या अफवा आहेत, असे सूचक विधान करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत सावध भूमिका घेतली आहे.  मातोश्रीवर शिवसेना खासदारांची महत्वपूर्ण बैठक झाली. यानंतर राऊत बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकसभा आणि राज्यसभेतील शिवसेनेच्या सर्व खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली होती.  आम्ही बैठकीत राफेलमधील घोटाळा आणि दुष्काळावर चर्चा केली.


खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षणांची तरतूद केली आहे. त्यानुसार ज्यांचं उत्पन्न वार्षिक 8 लाख रुपये आहे, त्यांना कर भरण्यापासून मुक्त केले जावे. त्यांना आता सरकारनं गरीब ठरवल्यानं करातून सूट देण्यात यावी, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.