1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जानेवारी 2019 (17:43 IST)

शरद पवारांची मोदींवर टीका

sharad pawar
बळीराजाशी बेईमानी करणाऱ्या भाजपाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आधी आश्वासनं द्यायची आणि नंतर ढुंकूनही पहायचं नाही हेच मोदीराज्य अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद  पवार यांनी भाजपावर आणि मोदींवर निशाणा साधला. एवढंच नाही तर दहा टक्के आरक्षणात ग्रामीण विद्यार्थ्यांचा निभाव कसा लागणार असाही प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. 
 

या सरकारने शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणसाचं हित पाहिलं नाही. त्यांना या घटकांशी काहीही घेणंदेणं नाही. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र सरकार त्यांना मदतही करत नाही. त्यामुळे जे शेतकऱ्याशी इमान राखत नाहीत त्यांना सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही असे पवार यांनी म्हटले आहे.