सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

येत्या १३ फेब्रुवारीपासून पुन्हा ‘उडान’चा प्रयोग

राज्यात पुन्हा ‘उडान’चा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यानुसार १३ फेब्रुवारीपासून नाशिक, जळगाव, कोल्हापूर आणि सोलापूर ही शहरे पुन्हा विमानसेवेने मुंबईशी जोडण्यात येणार आहेत. याशिवाय, नाशिक-पुणे दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे. त्यासाठी स्पाइस जेट आणि टर्बाे मेगा या दोन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.
 
राज्यातील विविध जिल्हे विमानसेवेने जोडण्याचा यापूर्वी करण्यात आलेला प्रयत्न फसला होता. एअर डेक्कन कंपनीला ‘उडान’ प्रकल्पांतर्गत विमानसेवा देण्यात अपयश आले. त्यामुळे आता एअर डेक्कनच्या जागी स्पाइस जेट आणि टर्बाे मेगा या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्यांत १३ फेब्रुवारीपासून नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे, जळगाव-मुंबई, कोल्हापूर-मुंबई आणि सोलापूर-मुंबई या पाच मार्गांवर पुन्हा विमानसेवेला सुरुवात होणार आहे.