मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 जानेवारी 2019 (16:35 IST)

मराठा आरक्षणाविरोधात एमआयएमकडून याचिका दाखल

मराठा आरक्षणाविरोधात एमआयएमने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती द्या. तसेच मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवालही रद्द करा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली. मराठा आरक्षण रद्द करून मराठा आणि मुस्लीम समाजाला विभागून आरक्षण देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
 
भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकसारखेच विषारी असून मराठा आरक्षण हे एक प्रकारचे ‘गाजर’ आहे. मराठा समाज सध्या त्यांची वाहवा करत असला तरी पडद्यामागील सत्य त्यांना लवकरच समजेल, अशी प्रतिक्रियाही इम्तियाज जलील यांनी दिली.