रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : अजित पवार

जल्लोष करण्यापूर्वी मराठा आंदोलनाची अंमलबजावणी करा असा चिमटा माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काढला आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या आणि त्यांची होत असलेली धरपकड थांबवा अशी मागणी त्यांनी आझाद मैदानात मराठा आंदोलकांची भेट घेतल्यानंतर केली.
 
अजित पवार म्हणाले की, कोणत्याही विधेयकाविना आरक्षण मंजूर झाल्याने आनंद आहेच, ४१ मराठा तरुणांनी बलिदान दिले असल्याने जल्लोष करणे बरोबर नाही. आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला मदत द्या. राज्यात शांततेत लाखोंचे ५८ मोर्चे निघाले हे राज्यातील नाही तर देशामधील उदाहरण आहे.