रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (13:32 IST)

अजितदादा आम्ही तुच्याकडूनच राजकारण शिकलो : चंद्रकांत पाटील

अजितदादा आम्ही तुमच्याकडूनच राजकारण शिकलो आहोत असा टोला महसूलंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना लगावला. आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल ते विधानसभेत बोलत होते.
 
एटीआरचे वाचन विधानसभेत सुरू असताना विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. तेव्हा सरकारने किती टक्के आरक्षण देणार, ते न्यायालयीन प्रक्रियेत कसे टिकणार असे प्रश्न विचारले. तसेच राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही केली. मराठा आरक्षणाचा एटीआर आल्यावर भाजप नेत्यांनी विधानभवनाच्या आवारात पेढे वाटून जल्लोष केला होता. तेव्हा अशाप्रकारे जल्लोष करणे बरोबर नाही असे मतही पवारांनी व्यक्त केले. त्याला पाटील यांनी असे उत्तर दिले.