शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

चांगली फिल्म बघतांना एडीटरची आठवण येत नाही : प्रशांत नाईक

अनेकदा फिल्म बघितल्यानंतर प्रेक्षक एडीटींगवर बोलतांना दिसतात. ही गोष्टी विडीओ एडीटरने काम चोख केलेले नसल्याचे लक्षण आहे. कारण संपूर्ण शुटींग पाहिल्यानंतरच 'एडीटींग' चांगले झाले की नाही ते ठरवता येते असे मत राष्ट्रीय पारितोषिकविजेते प्रशांत नाईक यांनी 'एडीटींग' या विषयावर झालेल्या कार्यशाळेत व्यक्त केले आहे. अंकुर फिल्म फेस्टीवलच्या समारोपाच्या दिवशी ही कार्यशाळा संपन्न झाली.
 
फिल्ममेकिंगमध्ये एडीटींग हा महत्वाचा ठप्पा असतो. एखाद्या व्यक्तीला एडीटींग आले असता तो चांगला फिल्ममेकर बनू शकतो. कारण यामध्ये फिल्मला दुसऱ्यादा डायरेक्ट करण्याचे काम असते असे नाईक यांनी यावेळी सांगितले. वेगवेगळ्या फिल्मस् दाखवून त्यांनी जगातला एडीटींगचा संपूर्ण प्रवास अभ्यासकांना उलगडून सांगितला.    
 
फेस्टीव्हलच्या समारोपाच्या दिवशी आई आणि मुलगा यांच्यातील प्रेमावर आधारीत मा हा लघुपट दाखवण्यात आला. बॉम्बे बांबू और बीएमसीही मुंबईत रस्त्यावर राहणाऱ्या लोकांची कथा, स्वामिनी दारू बंदी , हाये इराणी, अन फॉर्च्युनेट फ्लाईट,सिग्नल रेड, अ स्ट्रीट इन युर सेन्स , व्हिडियो गल्ली, द सिनेमा ट्रॅव्हलर, बिस्मार घर, इन जर्णी, गॉडेस इन मास्क , सिंधुर,व्हिलेज कम्युनिटी पर्वस वे फॉरेस्ट कॉन्सरवेशन, नाची से बांची दाखवण्यात आल्या.