गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता राधाकृष्ण गमे नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत. गमे सध्या उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आहेत. 9 महिन्यात त्यांची बदली करण्याच आली आहे. 
 
याआधी पीएमपीएमएलचे अध्यक्ष असताना देखील त्यांना राजकीय फटका बसला होता. त्यामुळे त्यांची बदली नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली होती. याआधी देखील नवी मुंबईचे पालिका आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांच्याविरोधात नवी मुंबई महापालिकेने अविश्वास ठराव पारित केला होता. त्यांच्या बदलीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महापालिकेच्या सभागृहात अविश्वास ठराव मंजूर केला होता. नवी मुंबईचे महापौरांनी देखील थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुंढे यांच्या बदलीची मागणी केली होती.