रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (08:59 IST)

छगन भुजबळ यांनी जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भुजबळ यांच्या निवासस्थानी एक पत्र आले असून त्यातून तुमची दाभोळकर, पानसरे यांच्यासारखी अवस्था करू अशी धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

‘तुम्ही सतत संभाजी भिडे गुरुजींच्या विरोधात बोलत असता, मनुस्मृतीला विरोध करत असता. तुमचा हा विरोध थांबवा अन्यथा तुमची दाभोळकर व पानसरे यांच्यासारखी अवस्था करू, अशी धमकी त्या पत्रातून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भुजबळांनी मनुस्मृतीवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी आम्हाला मनुस्मृती नको, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हवंय, असे विधान केले होते.