मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

बसचा कंडक्टर करतोय दारूची तस्करी

चंद्रपूर ला बस मधून वाहक अर्थात कंडक्टर दारू ची तस्करी  करीत असल्याची माहिती परिवहन विभागाला मिळाली त्यावरून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहकविरुद्ध तक्रार देऊन दारू जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे .

हा प्रकार यवतमाळ चंद्रपूर बस क्रमांक MH 40 Y 5381 ही बस यवतमाळ वरुन चंद्रपूर ला जात असताना या बस मध्ये कर्तव्यावर असलेले वाहक गणेश बनसोड याच्या शासकीय पेटित दारू च्या बॉटल असल्याची माहिती परिवहन विभागाच्या सुरक्षा दक्षता पथकातील अधिकाऱ्यांना मिळाली त्यावरून अधिकारी जयंत कांडलकर यांनी त्या वाहकाची पेटी तपासली असता त्या पेटित विदेशी मॅक्डोल चे 5 बॉटल आढळून आले तात्काळ परिवहन अधिकाऱ्यांनी शहर पोलिसात वाहकाला दारू च्या बॉटल सह ताब्यात देऊन त्याच्या विरुद्ध तक्रार दिली.या तक्रारी वरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.