शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुन्हा आवाज शिवसेनेचा, चोपले उत्तरभारतीयांना

मुंबई येथील दादरमध्ये रस्त्यावर स्टॉल लावून वाहतुकीची अडवणूक  करत होते. या कारणामुळे आणि हुज्जत घालत असल्याने उत्तर भारतीयांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी  मारहाण केली.

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुंबईला उपाशी ठेवण्याचे केलेले वक्तव्य ताजे  असून,  हा प्रकार घडला आहे. गुजरातमध्ये मागच्या महिन्यात मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणावरून 50 हजार उत्तर भारतीयांना गुजरातबाहेर चोप देवून  हाकलून लावले होते.  या प्रकरणावरून निरुपम यांनी उत्तर भारतीयांनी ठरवले तर मुंबईला उपाशी ठेवू शकतात, असे वक्तव्य केले होते.

यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी उत्तर भारतीयांना चोप दिला आहे. दादरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भररस्त्यात स्टॉल लावला होते याचा कारणातून उत्तरभारतीयांना मारहाण केली. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुका जश्या जवळ येत आहे तसे अनेक मुद्दे या प्रकारे तापवले जात असल्याचे समोर येते आहे.