अवनी अर्थात टी -१ वाघिणीला जेरबंद मोहिमेला धक्का
यवतमाळ जिल्ह्याच्या जंगलात T1 वाघिण शोधण्यासाठी आणि तिला जेरबंद करण्यासाठी जी मोहीम सुरु होती तिला धक्का बसला आहे .कारण या मोहिमेत सहभागी झालेले पैरा पॉवर मोटर आणि दोन इटालियन कुत्रे आता परत गेले आहे .येथील वाघिणीची परिसरात दहशत आहे आणि याच वाघिणीला पकडण्यासाठी आणलेल्या दोन इटालियन कुत्रे आता परत गेले असून पैरा पॉवर मोटर सुद्धा नादुरुस्त असल्याने आता या मोहिमेला धक्का बसला आहे . तर दुसरीकडे आपल्या देशात सोबत पूर्ण जगात अवनीला मारू नका असा दबाव वाढताना दिसून येतो आहे.
अवनीचे ते जंगल असून तिला तिचे जगू द्या असा संदेश दिला जातो आहे, सरकारने या विरोध असलेल्या मोहिमेवर कोट्यावधी खर्च केले आहेत. अवनी नरभक्षक आहेत असे प्रसिद्ध केले गेले आहे.