मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता यानुसार 180 तालुक्यांमध्ये उपाययोजना केल्या जाणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची घोषणा केली.
 
राज्यात सरासरीच्या 77 टक्के पाऊस पडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. दुष्काळसदृश्य भागाच्या पाहणीसाठी लवकरच केंद्राची टीम राज्यात येईल आणि त्यानंतर मदतीची घोषणा होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये उपाययोजनांना सुरुवात होईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.