मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (08:53 IST)

राम जन्मभूमी जमीन वादावर आज निकाल

अयोध्येतील बाबरी मशीद राम जन्मभूमी जमीन वादाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या निकालावरील आव्हान याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी अर्थात आज  सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. संजय किशन कौल व न्या. के. एम. जोसेफ यांच्यापुढे आव्हान याचिकांची सुनावणी होणार आहे.

२७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने १९९४ मध्ये मशीद हा इस्लामचा एकात्मिक भाग नसल्याच्या निकालावर फेरविचाराचा प्रश्न पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्यास नकार दिला होता. अयोध्या जमीन वादाच्या सुनावणीतूनच तेव्हा तो मुद्दा उपस्थित झाला होता. माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पीठाने हा नागरी दावा पुराव्यांच्या आधारे निकाली काढता येईल. पूर्वीच्या निकालाशी त्याचा काही संबंध नाही असा निकाल २ विरुद्ध एक मताने दिला होता. न्या. अशोक भूषण यांनी वेगळा निकाल देताना असे म्हटले होते, की १९९४ मधील निकालात पाच सदस्यांच्या न्यायपीठाने मशीद हा इस्लामचा एकात्म भाग नाही असे म्हणण्यामागे काही कारण असू शकते असे प्रतिपादन  केले होते. न्या. एस. अब्दुल नझीर यांनी मात्र मशीद हा इस्लामचा एकात्म भाग आहे की नाही हे ठरवण्यासाठी धार्मिक श्रद्धांचा विचार करण्याची गरज प्रतिपादन केली होती.