रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

अंकुर फिल्म फेस्टिवलचा समारोप

सामाजिक जीवनात आदिवासीना योग्य स्थान नाही, सिनेमातही चुकीचे चित्रण  
 
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते मेघनाथ यांनी व्यक्त केली खंत             
 
देशाच्या जडणघडणीत आणि विकासात आदिवासी समाजाने कायमच मोलाचे योगदान दिले आहे. मात्र सामाजिक जीवनात आदिवासीना योग्य स्थान मिळालेले नाही. सिनेमासारख्या समाज माध्यमाने नेहमीच आदिवासीचे चुकीचे चित्रण करत जंगलात राहणारे, ठराविक पेहेराव असलेले आणि नृत्य करणारे असेच त्यांचे चित्रण केले असल्याची खंत राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते मेघनाथ कुमार यांनी व्यक्त केले. ते अंकुर फेस्टीवलच्या समारोपप्रसंगी बोलत होते. गेल्या चार दिवसांपासून अभिव्यक्ति मिडीया फॉर डेव्हलपमेंट,नाशिक यांच्याकडून ७ व्या अंकुर फिल्म फेस्टीव्हलचे आयोजन कुसुमाग्रज स्मारकात करण्यात आले होते. यावेळी मेघनाथ कुमार यांच्या प्रसिद्ध फिल्म लोहा गरम है, गाव छोडाब नहीं , गाडी लोहार दाब मेल, सृष्टी कथाचे सादरीकरण करण्यात आले.    
 
वेगळी ठरली समारोपाची पद्धत
अंकुरच्या उद्घाटनाप्रमाणेच समारोपही वेगळ्या पद्धतीने करण्यात आला. यावेळी फिल्ममेकिंगचे चिन्ह असलेले ‘रील’ अभिव्यक्तीची संवाद माध्यमे आणि प्रेक्षक यांच्याकडून फिल्म निर्मात्यांना सुपूर्त करण्यात आले. यातून फेस्टीव्हलच्या माध्यमातून संवाद प्रक्रिया पूर्ण झाली असे दर्शविण्यात आले.