शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अजब कारण : रस्त्यात पाय पसरले या रागातून युवकाचा खून

किरकोळ करणातून खून प्रकरणे घडत असल्याने शहरातील कायद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असाच प्रकार नाशिक रोड परिसरात घडला असून, फक्त रस्त्यावर पाय पसरून का बसला या कारणावरून तीन युवकांनी एका युवकाला लोखंडी रॉड, क्रिकेट खेळण्याच्या बॅटने बेदम मारहाण केली होती. जखमी युवकाचा रुग्णालयात उपचार दरम्यान रात्री मृत्यू झाला आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
 
सविस्तर वृत्त असे की, मृत युवक अझीम अहमद खान वय 40 राहणारा  सिन्नर फाटा, विष्णू नगर हा शनिवार दि. 22 रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास घरासमोर रस्त्यावर बसलेला होता. त्यावेळी संशयित सचिन अमरनाथ महाजन (36),नाना अमरनाथ महाजन (40),राहुल ज्ञानेश्वर महाजन (20) सर्व,रा,विष्णू वाडी सिन्नर फाटा हे तेथे आले होते. तू रस्त्यावर पाय पसरून का बसला आहेस असे विचारात तिघांनी हुज्जत घातली सोबत त्याला लोखंडी रॉड,क्रिकेट खेळण्याच्या बॅटने जबर मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी युवकाला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा दि 23 रोजी सायंकाळी उपचार दरम्यान मृत्यू झाला असे  असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तक्रारी नुसार पोलिसांनी सांशीयत विरोधात खुनाचा  गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरीष्ठ पलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे करीत आहेत.