शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

३१ डिसेंबर किल्ल्यावर जाऊन दारू पिणार मग तुम्हाला चोप बसणार

वर्ष संपत आहे, त्यात शेवटचा दिवस हा पार्टीचा असतो, सध्या किल्ले आणि डोंगरावर जाऊन दारू पियुन धिंगाणा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र आता तुम्ही जर तसा प्लान करत असला, तर मग तुम्ही अडचणीत सापडणार आहात. इगतपुरी तालुक्यातील गडकिल्ल्यांवर 31 डिसेंबरला मद्यपान करणाऱ्यांवर शासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कळसुबाई मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना केली आहे.कळसुबाई मंडळाचे पदाधिकारी व ट्रेकिंगवीर मद्यपिना चोफ देणार असून पोलिसांच्या ताब्यात देणार आहे.  
 
31 डिसेंबर या दिवशी अनेक मद्यपान करणारे तरुण असतात विशेष म्हणजे एखाद्या निवांत ठिकाणी मद्यपान करण्यासाठी पसंती देतात, यावर्षी इगतपुरी तालुक्यातील कळसुबाई शिखर, कावनई किल्ला, त्रिगलवाडी किल्ला, कुलंग, मदन, अलंगगड, विश्रामगड आदी छोटय़ा मोठय़ा किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्या तरुणांची कोणतीही गय केली जाणार नाही अशी माहिती ट्रेकिंगवीर व कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथ मराडे यांनी दिली आहे.  धरणांचे माहेरघर म्हणूनदेखील तालुक्याची वेगळी ख्याती आहे त्यामुळे इगतपुरी तालुक्यात अनेक पर्यटक येतात. गडकिल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्या तळीरामांना इगतपुरी तालुक्यातील ट्रेकिंगवीर यांच्यासह पोलीस कार्यवाही करणार आहेत. सर्वाधिक वर्दळ असलेल्या कळसुबाई शिखरावर व कावनई किल्ल्यासह, भावली परिसरातील गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगवीर विशेष लक्ष देणार असून बाकी सर्व ठिकाणी पोलिसांची मदत घेणार असल्याची माहिती ट्रेकिंगवीर भागीरथ मराडे यांनी दिली. त्यामुळे आत्ताच सावध व्हा आणि कोणताही निर्णय घेण्याआगोदर विचार करा नाहीतर नवीन वर्ष तुरुंगात काढावे लागणार आहे.