शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अरे देवा एक कोटी २० लाख रुपयांचा गुटखा पकडला

रस्त्याने अनेकदा आपण गुटका खाणारे पाहतो, ते सर्रास रस्त्यावर थुकतात तर अनेक भिंती रंगवतात. गुटखा सेवन केल्याने तोंडाचा कर्करोग होतो. महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. मात्र तरीही तो सर्रास मिळतो.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने राज्यात संपूर्ण  बंदी असलेल्या गुटख्याच्या वाहनावर धडक कारवाई केली आहे. या मोठ्या कारवाईत  एक कोटी २० लक्ष ४४ हजार ५४१ रुपयांचा १२० बाबा नावाचा सुगंधीत तंबाखूचा कंटेनर पकडला आहे.

राज्याची सीमेवर महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर मोठ्या प्रमाणात गुटख्याची ने-आण होते, याची खबर पोलिसांना मिळाली होती, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सीमेवरुन येणाऱ्या गुटख्यावर नजर ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या.  मरखेल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड यांनीत्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मरखेल-तुंबरपल्ली रस्त्यावर सापळा रचला होता. तेव्हा पोलिसांनी  कंटेनर क्र.युपी-१४-एफटी-७१९८ ची तपासणी केली होती,  त्यामध्ये  महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असणारा १२० बाबा नावाचा सुगंधी तंबाखू होता. पोलिसांनी कागदपत्रांचीही पाहणी केली.

महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची ने-आण करणारा हा कंटेनर मरखेल पोलिसांनी जप्त केला. कंटेनर व सुगंधीत तंबाखूसह याची किंमत १ कोटी २० लक्ष ४४ हजार ५४१ एवढी होते. हा कंटेनर मुद्देमालासह जप्त करण्यात आला असून, कंटेनर चालक महेश बिशक्रर्मा रा.रोनग्राम जि.भेट यास ताब्यात घेण्यात आले आहे.