रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भाजी खाल्ल्याने विषबाधा एकाचा मृत्यू

नांदेडमध्ये मेथीची भाजी खाल्ल्याने विषबाधा होऊन वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली. कोंडिबा कदम असं मृत्यू झालेल्या 60 वर्षीय वृद्धाचं नाव आहे. मेथी खाल्ल्याने एकाचा मृत्यू झालाच शिवाय अन्य 7 जणांना अस्वस्थ होऊ लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नांदेडच्या सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 
उमरी तालुक्यातील कळगाव गावात ही धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी रात्री कदम कुटुंबाने मेथीची भाजी खाल्लाने हा प्रकार घडला. या विषबाधेमुळे कुटुंबातील एकाचा मृत्यू झाला. तर श्लोक शिवाजी कदम हा गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचा शोध घेणं तूर्तास सुरु आहे. या घटनेने उमरी तालुक्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे.