शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

उद्धव ठाकरे आता वाराणसीला जाणार, काशी विश्वेश्वराचे दर्शन घेणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यानंतरआता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात जाणार आहेत. पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे वाराणसी इथे काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणार आहेत. त्यामुळे अयोध्येनंतर वाराणसी आता भगवीमय होणार आहे.
 
उद्धव ठाकरे सोमवारी पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राच्या प्रति काशीला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. या दौऱ्यानंतर ते वाराणसी इथे काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणार आहेत. वाराणसी हा लोकसभा मतदारसंघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीआधी वाराणसीचा दौरा करणार हे निश्चित आहे.वाराणसी दौऱ्याअगोदर उद्धव ठाकरे सोमवारी सकाळी पंढरपुरात सभा आणि महाआरती करणार आहेत.