1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राष्ट्रवादीने पुणे लोकसभेच्या जागेचा हट्ट सोडला

pune lok sabha
अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभेच्या जागेचा हट्ट सोडला आहे. पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे दावा केला होता.  मात्र जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ राखण्यात काँग्रेसला यश आले आहे. दुसरीकडे सहा मतदारसंघावरुन अद्यापही काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये तिढा कायम आहे. अहमदनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नंदुरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या सहा जागांवरुन अद्याप रस्सीखेच सुरु आहे.
 
भाजपचे अनिल शिरोळे सध्या पुणे लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून विश्वजीत कदम यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र त्यांचा मोठा पराभव झाला होता. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता.