1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मराठवाड्याच्या ८५ टक्केपेक्षा जास्त भागात दुष्काळ

मराठवाड्यातील 85 टक्केपेक्षा जास्त भागात  दुष्काळ आहे. आठ जिल्ह्यांतील 8530 गावांपैकी 7281 गावांतील खरीपाचे उत्पादन 50 टक्क्यांपेक्षा कमी आले आहे. औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी सरकारला सादर केलेल्या अहवालातून सदर माहिती उघड झाली आहे.
 
हिंगोली जिल्हा वगळता मराठवाड्याच्या इतर सर्व जिल्ह्यांतील सुमारे 48 लाख हेक्टर शेतजमिनीला दुष्काळाचा तडाखा बसला आहे.  या भागातील दुष्काळ निवारणासाठी सुमारे 3 हजार कोटी रुपयांची गरज आहे, अशीही मागणी भापकर यांनी या अहवालाच्या माध्यमातून केली आहे.