रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

म्हाडाची घरे आणखीन स्वस्त होणार

पुढील वर्षीच्या म्हाडाच्या घरांच्या लॉटरीतील घरांच्या किमती 30 ते 70 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. यानंतरही घरांच्या किमती आणखी कमी करण्याची मागणी होत होती. म्हाडा प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीमध्ये अत्यल्प आणि अल्प गटातील घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यल्प गटातील घरे ही 70 टक्क्यांपर्यंत कमी होणार होत्या त्या आता 75 टक्क्यांनी कमी होतील. अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किंमती 50 टक्क्यांनी कमी होणार होत्या त्या 55 टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचेही सामंत म्हणाले. 

हा निर्णय अर्थात पुढील वर्षाच्या लॉटरीपासून लागू होईल. म्हाडा माहुलवासियांना सुमारे तीनशे संक्रमण शिबिरांचे गाळे देणार आहे. माहुलवासीयांना घरे मिळावीत यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत यापुर्वी चर्चा झाली तेव्हा म्हाडाने संक्रमण शिबिरातील तीनशे घरे देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. पालघरमध्ये पोलिसांना 186 घरे द्यायचा निर्णयदेखील म्हाडाने घेतला आहे.