बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शाळेच्या सहलीच्या बसला अपघात,१५ विद्यार्थी जखमी

अहमदनगर येथील डॉन बॉस्को शाळेच्या सहलीच्या बसला अपघात झाला. कल्याण-अहमदनगर महामार्गावर गायमुखवाडी येथे लक्झरी बस आणि पिक-अपची समोरासमोर धडक झाली. त्यात दोन्ही वाहनांच्या इंजिन्सनी पेट घेतला आणि ही दुर्घटना घडली. यात तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शिक्षकाचा, बस क्लिनरचा आणि पिक-अप चालकाचा समावेश आहे. तसेच यात १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. 
 
आनंद ट्रॅव्हल्सच्या बसमधून गेलेली डॉन बॉस्को शाळेची सहल कल्याणहून नगरकडे परतत होती. त्याच वेळी मालवाहतूक करणारा पिकअप आळेफाट्याहून कल्याणचा दिशेला निघाला होता. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. 

चित्र: प्रतीकात्मक