संबंधित माहिती
- पैशांचा पाऊस पाडतो सांगणारे गजाआड
- भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीने फुंकले रणशिंग..पवार, भुजबळ, जयंत पाटील सर्व उपस्थित
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्याच्या तळघरात
- मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणे भोवले, एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण
- ग्रामपंचायत कर्मचार्यांना पीएफ व ग्रॅच्युइटी देणार: पंकजा मुंडे
पश्चातापातून तरुणाची आत्महत्या
जळगावमध्ये चोरीच्या घटनेत अटक होऊन दोन दिवसांपूर्वीच जामीन झाल्यानंतर घडलेल्या घटनेच्या नैराश्यातून एका तरुणाने रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी असोदा रेल्वेगेटनजीक डाऊन मार्गावर घडली. दुपारी ४ वाजता शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. संघर्ष उर्फ राजेश संजय ठाकरे (२२) असे या तरुणाचे नाव आहे.
दुपारी १२ वाजेच्या दरम्यान रेल्वे डाऊन लाईनवर असोदा रेल्वे गेटजवळ एका युवकाने आत्महत्या केली असल्याची माहिती तालुका पोलिसांना रेल्वेचे उप स्टेशन प्रबंधक आर. के. पलरेजा यांनी तालुका पोलिसांना दिली. यावेळी काही युवकांनी संघर्षला ओळखले.
