शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्याच्या तळघरात

balasaheb thackeray
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्याची जागा मिळाली आहे. ही जागा आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या नावावर झाली आहे. यामुळे आता मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना लवकरच महापौर बंगला सोडून राणीच्या बागेतीलपर्यायी निवासस्थानी राहतील. तर जानेवारी महिनाअखेरीसपर्यंत स्मारकाच्या भूमिपुजनाचाही कार्यक्रम होणार आहे.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्याच्या तळघरात अंडरग्राऊड ठिकाणी होणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कोणत्याही प्रकारे तोडफोड किंवा येथील झाडांचीही कत्तल होणार नाही. महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्व विभागाकडून 'ब' दर्जा आहे. या वास्तूचे जतन करुन त्याचे पर्यटनात रुपांतर होईल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे होणारे वाद आणि इतर कुरबुरी सध्या तरी थांबणार आहेत.