मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणे भोवले, एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण

सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवने चांगेलेच भोवले असून,  एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे.  पोलिसांच्या दडपशाही धोरणाचा निषेध कार्यकर्त्यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना, काँग्रेसच्या काही नगरसेवकांनाही पोलिसांनी  ताब्यात घेतले. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर आणीबाणी सदृश स्थिती निर्माण केल्याचा आरोप केला असून , पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेमुळे विरोधकांकडून संताप व्यक्त केला आहे.

सोलापूर दौऱ्यात प्रधानमंत्री  मोदी हे सभास्थळी निघाले होते, तेव्ह सुरवातील  काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा दिला आहे. थोडे अंतरावर असलेल्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी या वाहन ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. त्यामुळे चिडलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी थेट मारहाण केली आहे. सोबतच  ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ आकाशात काळे फुगेही सोडले आहेत.