शनिवार, 2 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पैशांचा पाऊस पाडतो सांगणारे गजाआड

पुण्यातल्या पिंपरीत घरात पैशांचा पाऊस पाडतो असे सांगत मांडूळ विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या दोघांकडून पाच लाख रुपये किंमत असलेला मांडूळ जातीचा सापही जप्त केला आहे. हेमंत संजू पवार आणि आकाश वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंत पवार आणि आकाश वाघमारे हे दोघे मांडूळ विकणार असून ते ग्राहकाच्या शोधात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर  पोलीस शिपाई मालुसरे यांनी या दोघांशी ग्राहक म्हणून संपर्क साधला. चार लाख रुपयांमध्ये मांडुळाचा व्यवहार ठरला. मालुसरे यांना या दोघांना नाशिक-पुणे महामार्गावरच्या मोशी या ठिकाणी बोलावले. ठरल्यानुसार मालुसरे ग्राहक बनून या दोघांना भेटण्यासाठी गेले. तिथे हे दोघे येताच सापळा रचून पोलिसांनी त्यांना अटक केली.