पुण्यातील मेजर शशी नायर शहीद  
					
										
                                       
                  
                  				  जम्मू- काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवलेल्या  स्फोटात पुण्यातील मेजर शशी नायर  (३३) शहीद झाले आहेत. शशी नायर हे पुण्यातील खडकवासला येथे राहत होते. गेल्या ११ वर्षांपासून ते सैन्यात कार्यरत होते.
				  													
						
																							
									  
	 
	राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागातील रूपमती आणि पुख्खरणी या ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळ पेरुन ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या दोन स्फोटांमध्ये सैन्यातील  मेजर शशीधरन नायर हे शहीद झाले आहे. त्यांच्यासोबत एक जवानही शहीद झाला आहे. नियंत्रण रेषेजवळ गस्त घालणाऱ्या सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यासाठीच दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला.