रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईच्या ट्राफिकचा अजितदादांना फटका, लोकलमध्ये विंडो सीट

मुंबई कोणालाही लहान मोठे मानत नाही. याचा पुन्हा प्रत्येय आला आहे. मुंबईची ट्राफिक तर विचारू नका या ट्राफिकचा त्रास जसा सामान्य माणसाला रोज होतोच  तसा तो मोठ्या नेत्यांनाही होतो. तर मग याला अपवाद महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कसे राहतील . कारण डोंबिवली येथे एका कार्यक्रमाला जाण्यासाठी ट्रॅाफिकचा अडथळा येवू शकतो. त्यामुळे नियोजित कार्यक्रमाला वेळेत पोहोचता येणार नाही. हा विचार करुन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज लोकल ट्रेनने प्रवास केला आहे. 
 
सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून डोंबिवलीला जाणारी फास्ट लोकल पकडली होती. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद संपल्यानंतर अजित पवारांना मुंबईतल्या ट्रॅफिकला टाळण्यासाठी लोकलने प्रवास करावा लागला आहे. त्यांनी सीएसटीएमवरून डोंबिवलीकडे जाणारी  लोकल पकडली आहे . त्याबरोबर  त्यांना बसायला विंडो सीट देखील  मिळाली आहे. तर दुसरीकडे मात्र गर्दीच्या वेळी सामान्य मुंबईकर देखील विंडो सीट मिळवण्यासाठी अशाच प्रकारची युक्ती करताना दिसतात.त्यांच्यासोबत यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रकाश गजभिये आणि माजी खासदार आनंद परांजपे देखील उपस्थित होते.