मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (11:16 IST)

...म्हणून मी फेटा बांधला नाही : अजित पवार

build a Feta
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर जल्लोष करणार्‍या सत्ताधारी शिवसेना- भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.  'आरक्षणाच्या निर्णयात प्रत्येकाचा वाटा आहे. त्यामुळे कुणी एकाने त्याचे श्रेय घेणे चुकीचे आहे. श्रेय घेण्याआधी सरकारने आरक्षणाची अंलबजावणी करावी, असे सांगतानाच, ' मलाही जल्लोषाचा फेटा बांधता आला असता. पण आरक्षणासाठी जीवन संपवणार्‍या 40 तरुणांचे बलिदान माझ्या डोळ्यांपुढे आहे,' असे पवार यांनी स्पष्ट केले.