मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 नोव्हेंबर 2018 (08:36 IST)

राम कदम खाली बसा, अवनीने तुमचा नंबर घेतला नाही - जयंत पाटील

विरोधक आणि सत्तधारी यांच्यात कलगीतुरा विधानसभेत पहायला मिळतो. मात्र कधी कधी जोरदार धक्का देखील देतात. असाच प्रकार आमदार राम कदम सोबत झाला आहे. अवनी वाघीण मृत्यू प्रकरणावरून जयंत पाटील यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर यावेळी बोलत होते, तेव्हा ते म्हणाले ‘प्रचंड मोठ्या प्रमाणावर यंत्रणा जंगलामध्ये पेरून देखील अवनी वाघिणीला तुम्ही ट्रॅन्क्वेलायझर न देता गोळ्या घातल्या’,अशा शब्दांत जयंत पाटील यांनी मुनगंटीवार ऐकवल. त्याच वेळी आमदार राम कदम अवनी वाघीण प्रकरणावरूनच जयंत पाटील यांच्या बोलण्यात अडथळा आणत होते.  पण विधान भवनामध्ये बोलण्याचा दांडगा अनुभव असलेल्या आणि कसलेल्या जयंत पाटलांनी एकाच मुद्द्यावर राम कदम यांचा अडथळा अगदी अलगद दूर सारला आहे. राम कदम बोलण्यात अडथळा आणत आहेत हे लक्षात येताच जयंत पाटील यांनी अवनी वाघिणीवरून थेट राम कदम यांच्या ‘फोन नंबर’ वक्तव्यावर उडी घेतली होती. राम कदम यांना सर्व आवेश बाजूला ठेऊन पुन्हा शांत होऊन जयंत पाटील यांचं भाषण ऐकत राहावं लागलं काय म्हणाले पाटील "जयंत पाटील म्हणाले….अध्यक्ष महोदय यांना खाली बसवा. अहो राम कदम, तुमचं कौतुक संपूर्ण महाराष्टट्र करतोय. अवनी वाघिणीने तुमचा फोन नंबर घेतला नाही, ही तुमची समस्या आहे. तुमचं कौतुक भाजपमधूनही होत आहे. त्याबद्दल तुम्हाला तोड नाही. तुम्ही खाली बसा.:"
राम कदम यांनी मुलींबरोबर लग्न करायचे मी लावून देतो त्यांना उचलून आणू असे कार्यकर्त्याना सांगितले होते सोबत माझा फोन घ्या असे वादग्रस्त आणि महिलांना अपमानित करणारे वक्तव्य केले होते.