1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 नोव्हेंबर 2018 (08:34 IST)

मराठा आरक्षण देतांना सरकारने काळजी घ्यावी - भुजबळ

chagan bhujbal
आरक्षणाच्या विषयावर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. छगन भुजबळ नी आपले मत व्यक्त केले. राज्यात ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून ५२ टक्के आरक्षण आहे. हे वरील दोन टक्के आरक्षण गोवारी आणि कोष्टी समाजाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तो कोर्टाने मान्य केला नाही. त्यामुळे ते ओबीसीमध्ये आले. परिणामी ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आले, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. आता मराठा समाजाला आरक्षण दिले तर ते ही ओबीसीमध्ये येणार आहे. त्यामुळे सरकारने आरक्षण देताना काळजी घ्यावी असे विधानसभेत बोलल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर मराठा समाजालाही फायदा होणार नाही आणि ओबीसी समाजालाही काही मिळणार नाही. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या केंद्र सरकारच्या परिपत्रकात ५० टक्क्यांवरील २ टक्के आरक्षण लागू नसल्याचा स्पष्ट उल्लेख असल्याची माहिती त्यांनी संदर्भादाखल दिली.