सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (16:27 IST)

विरोधकांनी अडथळा आणू नये मुख्यमंत्र्याचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मराठा आरक्षणावर आम्ही ठाम आहोत, विरोधकांनी यामध्ये अडथळा आणू नये’ असा इशारा दिलाआहे. विधीमंडळात मराठा आरक्षणासंबंधी तोडगा काढण्यासाठी गटनेत्यांसोबत बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे आरक्षणाबाबत नेमके काय होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर दुसरीकडे विरोधक आरक्षणाचा अहवाल मांडावा या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, याबाबतची पुढील रणनिती ठरवण्यासाठी विधिमंडळामध्ये विरोधका आमदारांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. बुधवारी अर्थात उद्या मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक राज्यशासन विधानसभेत मांडणार आहे. त्यानंतर गुरुवारीदेखील विधानपरिषदेमध्ये हे विधेयक मांडण्यात येईल. मात्र जोपर्यंत अहवाल सादर केला जात नाही तोपर्यंत कामकाज सुरु होऊ देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतला आहे.
 
मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. त्यामध्ये मराठा आरक्षण विधेयक येत्या बुधवारी, २८ नोव्हेंबर रोजी विधानसभेत तर गुरुवारी, २९ नोव्हेंबर रोजी विधानपरिषदेत मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘कायदेतज्ज्ञ आणि अधिकारी विधेयक तयार करत असून मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार. तसेच कलम 9 आणि 11 अन्वये सरकारला मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे. तो सादर केल्यावर कलम 15नुसार हा अहवालही सभागृहात सादर करण्यात येणार आहे. विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यावर ते राज्यपालांच्या शिफारशीकडे पाठवले जाईल, त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.’