शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (16:30 IST)

पवारांना कमळांचा बुके दिला, उदयनराजे भोसले यांचे विधान

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांना कमळांचा बुके दिलाय असं असं सूचक विधान केलंय. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिल्यानंतर उदयनराजेंनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजेंनी विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणूक घड्याळावर की कमळावर लढवणार?' असा प्रश्न विचारला असता उदयनराजेंनी हे सूचक विधान केलंय. 
 
उदयनराजे भोसले हे सध्या सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. पण त्यांना २०१९ साली पुन्हा तिकीट द्यायला राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा विरोध आहे. मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत याचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास अनेक नेत्यांनी विरोध केला होता. साताऱ्यातून रामराजे निंबाळकर किंवा दुसरा उमेदवार द्यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली होती.