मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 नोव्हेंबर 2018 (08:32 IST)

तुकाराम मुंढे यांच्या साठी नागरिक रस्त्यावर, महामोर्चा

we want tukaram mundhe असे म्हणत नागरिक रत्यावर उतरणार आहेत. तुकाराम मुंढे हे सध्या पूर्ण राज्यात गाजत असलेला प्रशासकीय अधिकारी आहेत. नाशिक येथून त्यांची ११ वी बदली झाली असून त्यांच्या १२ वर्षातील ही बदली आहे. मुंढे हे राजकारणी लोकांना नकोसे असले तरी नागरिकांना त्यांची कडून मोठ्या अपेक्षा असून ते फार प्रसिद्ध देखील आहेत. सध्या राज्यात मुंढे परत नाशिकला जाणार का ? त्यांना सरकार पाठवेल का ? याबाबत जोरदार चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले त्यामुळे पूर्ण राज्याचे लक्ष नाशिक कडे लागले आहेत. तुकाराम मुंढे यांनी अनेक लोकपयोगी कामे केले असल्याने ते फार लोकप्रिय आहेत. त्यांचा आंदोलनात समाजसेविका अंजली दमानिया या देखील पाठींबा देणार आहेत. त्यामुळे आता सरकारवर जबर दबाव निर्माण करण्यात येतो आहे. सोशल मीडिया वर तर मुंढे यांना समर्थन करत नागरिक सरकला प्रश्न विचारत आहेत.