मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दुर्दैवी मुंबईतील या क्रिकेटपटूचा हृद्य विकाराने मृत्यू

क्रिकेट विश्वात पुन्हा हादरवणारी घटना घडली आहे. या मध्ये नवी मुंबईमध्ये एका क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असम  मुंबईच्या घणसोली येथे ही घटना घडली आहे.  क्रिकेटपटू संदीप म्हात्रेचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोलदांजी करणाऱ्या संदीपच्या छातीत एका सामन्यात  दुखायला लागले होते. षटक पूर्ण करून सामना अर्धवट सोडून संदिपला घरी नेले. घरी गेले असता संदीपचा मृत्यू झाला.  संदीप हा एक अष्टपैलू खेळाडू होता. संदीपने शालेय जीवनापासून स्वतःचे  नाव क्रिकेट क्षेत्रात गाजवायला सुरवात केली.  
 
नवी मुंबई महापौर चषक क्रिकेट स्पर्धा दहावीला असताना संदीपने गाजवली होती. त्यावेळी त्याने शेतकरी शिक्षण संस्थेचे स्थान आपल्या जादुई गोलंदाजीने निर्माण केले होते. गजानन क्रिकेट संघ (म्हात्रे आळी) या संघाच्या अनेक विजयामध्ये संदीपचा सिंहाचा वाटा होता. अनेक स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाज म्हणून संदीपचा गौरव करण्यात आला होता. संदीप हा पंचक्रोशीत अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचा. प्रत्येक संघातील खेळाडूंशी संदीपचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याच्या मृत्यू मुळे दुख व्यक्त केले जात असून प्रकृती कडे लक्ष दिले पाहिजे असे बोलले जात आहे.