सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अठरा वर्षांनी ती सध्या काय करते बघायला गेला नि बलात्कार केला, पिडीतेची तक्रार

होय पुर्वश्रमीच्या प्रियकराने प्रियसीला शोधले मात्र तिचे लग्न केले होते, त्याने तिला गळ घालत १८ वर्षांनतर परतलेल्या प्रियकराने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथे घडलीय. सोबतच त्याने या  बलात्काराची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली होती. तर नराधमाने पीडितेकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रेयसीने  फिर्याद नोंदवली आहे. विश्वनाथ वाल्हे असं या प्रियकराचं नाव आहे.  चिंचवड पोलीस विश्वनाथचा कसून  शोध घेत असून, संशयित आरोपी विश्वनाथ वाल्हे व पीडिता हे दोघं नुकतेच फेसबुकवरुन पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले होते. मात्र पूर्व प्रियकर इतका मोठा गोधळ घालेल असे तिला वाटले सुद्धा नाही.
 
लग्नापूर्वी विश्वनाथशी ३८ वर्षीय पीडित महिलेचे  प्रेम संबंध होते. परंतु लग्न झालं आणि ती उल्हासनगर ठाणे येथे राहायला गेली. त्यानंतर जवळपास १८ वर्ष दोघांमध्ये काहीच संपर्क नव्हता. मात्र, काही महिन्यांपूर्वी दोघे फेसबुकवरून पुन्हा  संपर्कात आले होते.  एक दिवस विश्वनाथ पीडितेला घेऊन चिंचवड येथे आला. त्यानंतर त्याने तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचं त्याने व्हिडिओ शूटिंगही केलं होते. एक लाख रुपये दे नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी त्याने दिली होती.  त्या अवस्थेतील तिचे  फोटो आणि व्हिडिओ तिच्या भावाला आणि नवऱ्याला दाखवयाची धमकीही विश्वनाथने दिली. मात्र, कशीबशी ही महिली अखेर तिथून निसटली आणि तिने थेट चिंचवड पोलिस स्टेशनात धाव घेत घेतली. पोलिसांनी पीडितेची लेखी तक्रार नोंदवून घेतली असून, ते फरार विश्वनाथचा शोध घेतला आहे.