1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

बीडमध्ये घटसर्पामुळे ८० पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू

maharashtra news
बीड जिल्ह्यातील आंतरवन पिंपरी गेल्या काही दिवसापासून अज्ञात आजारामुळे गुरं दगावत आहेत. आतापर्यंत ८० पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. या जनावरांना घटसर्प या रोगाची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटसर्प रोगावर आवश्यक असणारी लस नसल्याने हा घात झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन कार्यलयात जाऊन चांगलाच राडा केला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. पशुसंवर्धन अधिकारी संतोष पालवे यांना धक्का बुक्की केली.
 
 गेल्या आठ दिवसापासून या गावातील जनावरं अज्ञात आजाराने दगावत होती. मात्र नेमकं जनावरांना काय झाले समोर येत नव्हते. दगावलेल्या जनावरांमध्ये गाय, म्हैस यासह शेळी आणि कोकरांचा समावेश आहे. मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांना घटसर्प आजार झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अंथरवन पिंपरी येथील सर्वच जनावरांवर उपचार सुरु आहेत.