बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

युतीसाठी आमचा हात पुढेच : दानवे

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आमचा हात पुढेच आहे. आता शिवसेनेकडून त्याबद्दल सकारत्मक निर्णय कधी होतो. याकडे लक्ष लागून असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी दिली.  भाजप कार्यकारणीचे पहिले सत्र संपल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. याबैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासह दुष्काळाच्या मुद्यावर आढावा घेण्यात येणार असून, मराठवाड्यातील मंत्री व त्यांच्या मागण्या आणि नियोजन मांडणार आहेत. 
 
शिवसेनाला जास्त जागा देण्यास संदर्भात निर्णय झाला आहे काय ?, असे त्यांना विचारले असता, स्पष्ट नकार देत युती संदर्भात अंतिम चर्चा झाली नसल्याचे त्यांनी संगितले. युतीचा निर्णय कधी होणार असे विचारले असता, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरही युतीचा निर्णय होऊ शकतो.