मनसैनिकांकडून व्हिडिओ व्हायरल
बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारीत ठाकरे हा सिनेमा प्रदर्शित झाला. मात्र मनसैनिकांनी आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारीत केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. यामधून बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच आजची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा संदेश देण्यात आला आहे. तसंच व्हिडीओच्या प्रत्येक फ्रेममध्ये बाळासाहेबांचा फोटो व या फोटोशी साधर्म्य असणारा राज यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. त्यामुळे उद्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणजे राज ठाकरे अशी मनसैनिकांची भावना असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिनेमाच्या शेवटी To Be Continued… अशी सूचना येते. म्हणजेच ठाकरे -2 येणार हे नक्की. हाच संदर्भ घेत मनसैनिकांच्या मनातील ठाकरे-2 चा एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओसाठी जे गाणं वापरण्यात आलं आहे तेही ठाकरे सिनेमातलंच आहे.