सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जानेवारी 2019 (10:17 IST)

येत्या काही दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता

येत्या काही दिवसांत नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील तीन दिवस थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. त्याचा परिणाम हा राज्यातील हवामानावर झाला आहे. त्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता अधिक आहे.
 
पुढचे तीन ते चार दिवस राज्यात थंडीचा मुक्काम कायम राहणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात दोन दिवसांपासून गारवा जाणवत आहे. हीच स्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. तर २६ ते २८ असे तीन दिवस उत्तर मध्य महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये काही ठिकाणी शीत लहरीची शक्यता आहे.